
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9280.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसापासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. मागील 5 दिवसात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 6734 रुपयेवरून वाढून 9280.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 9,756.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा ग्रुप भारतात 2 सेमीकंडक्टर प्लांट्स उभारणार आहे. मागील आठवड्यात केंद्रीय कॅबिनेटने देशात 3 सेमीकंडक्टर प्लांट्स उभारणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यापैकी टाटा समूह 2 प्लांट्स उभारणार आहे. टाटा समूह गुजरात आणि आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लांट्स उभारणार असून त्यासाठी 1.26 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या प्लांट्सचे बांधकाम 100 दिवसात पूर्ण करण्याची घोषणा टाटा ग्रुपने केली आहे.
Tata Electronics ही कंपनी तैवानची Powerchip Semiconductor Manufacturing Corp सोबत सेमीकंडक्टर फॅब प्लांट उभारणार आहे. हा प्लांट गुजरातमधील धोलेरा येथे बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 91000 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय टाटा सेमीकंडक्टर असेंबली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आसाम राज्यात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग युनिटची उभारणी करणार आहे. यासाठी 27000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
मागील 6 महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6807 रुपयेने वाढली आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2472.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 मार्च 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 9280.40 रुपये किमतीवर पोहचले होते. 1 जानेवारी 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 4258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 9,756.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. हा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1735 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.