
Tata Motors Share Price | सध्या जर तुम्ही टाटा उद्योग समूहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणे फायद्याचे राहील. ब्रोकरेज फर्म टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 425.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
टाटा मोटर्स लक्ष्य किंमत :
बीएनपी परिबस आणि शेअरखानच्या अहवालानुसार टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 516 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणून या ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 516 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्सचा मागोवा घेणाऱ्या 32 तज्ञांपैकी 15 ने ‘स्ट्राँग बाय’ चा सल्ला दिला आहे. तर 11 तज्ञांनी ‘बाय’ , आणि 5 तज्ञांनी स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे, तर 1 तज्ञ स्टॉक ‘सेल’ करण्याचा सल्ला देत आहे.
टाटा मोटर्स कंपनीबद्दल :
टाटा मोटर्स ही ऑटो क्षेत्रातील एक दिग्गज लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स बाजार भांडवल 1,39,644.94 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे. या कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 2,957.71 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीला 1516 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.