 
						Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मजबूत निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 4.49 टक्के वाढीसह 665.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नुवामा इन्स्टिटशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, विक्रीतील सुधारणा, मार्जिन वाढ आणि कर्ज कपातमुळे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.63 टक्के वाढीसह 646.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 840 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्स कंपनीचा EBITDA तज्ञांच्या अंदाजापेक्षा 7 टक्के कमी आहे. विकसित बाजारपेठेत निर्माण झालेली आर्थिक मंदी आणि इतर नकारात्मक बाबी हे टाटा मोटर्स कंपनीच्या जेएलआर व्यवसायासाठी चिंता निर्माण करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या JLR व्यवसायामुळे कंपनीचा रोख प्रवाह स्थिर राहण्याची शक्यता आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टाटा मोटर्स स्टॉकची लक्ष्य किंमत 600 रुपयेवरून वाढवून 630 रुपये केली आहे. प्रभुदास लिल्लाचर प्रभुदास लिल्लाधर फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन लक्ष किंमत 760 रुपयेवरून वाढवून 785 रुपये केली आहे.
परकीय ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा मोटर्स स्टॉकवर 803 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि Jefferies फर्मने देखील टाटा मोटर्स स्टॉकवर 800 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून ‘बाय’ रेटिंग दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		