
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आज आपली उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिमाहीत निकालात कंपनीची मजबूत कामगिरी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सलग पाच दिवसांपासून या वाहन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 896.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.16 टक्के वाढीसह 885.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज सकाळच्या ओपनिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 900 रुपये किंमत स्पर्श केली होती.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 884.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 900 रुपये किमती जवळ ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनी आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे. त्यापूर्वी शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या लक्झरी जॅग्वार लँड रोव्हर शाखेची विक्री डिसेंबर तिमाहीत विक्रमी पातळीवर पोहचली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 1.01 लाख वाहनांची घाऊक विक्री साध्य केली आहे. यात वार्षिक आधारावर 27 टक्केची वाढ नोंदवली गेली आहे.
डिसेंबर 2023 च्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीच्या कमाई आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स कंपनीचा दोन तृतीयांश महसूल जग्वार लँड रोव्हर या परकीय वाहन निर्माता शाखेतून येतो. डिसेंबर तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीच्या कमर्शियल वाहन विक्रीत 1 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या विभागात 34,180 युनिट्स वाहन विक्री साध्य केली आहे. कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल 8 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
28 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 400.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 123.94 टक्क्यांनी वाढली आहे. 31 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 896.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.