
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. टाटा मोटर्स कंपनी 10 मे रोजी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
नुकताच टाटा मोटर्स कंपनीने साउथ इंडियन बँकेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत टाटा मोटर्स कंपनी आपल्या व्यावसायिक वाहन ग्राहकांना आणि डीलरशिप्सना आर्थिक सुविधा प्रदान करणार आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 1,008 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर कंपनीच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. टाटा मोटर्स कंपनीने जुलै 2023 मध्ये हे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. विलीनीकरणाच्या या प्रस्तावानुसार गुंतवणुकदारांना टाटा मोटर्स डीव्हीआर कंपनीच्या 10 शेअर्सच्या बदल्यात टाटा मोटर्स कंपनीचे 7 शेअर्स वाटप केले जाणार आहेत.
एप्रिल 2024 महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की जग्वार लँड रोव्हर कंपनी तामिळनाडूमध्ये लक्झरी कारचे उत्पादन सुरू करणार आहे. यासाठी टाटा मोटर्स कंपनीने 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून नवीन प्लांट उभारण्याची योजना आखली आहे. या प्लांटमध्ये JLR ब्रँडेड कार भारतात उत्पादन केली जाणार आहे. या प्लांटमध्ये तयार होणाऱ्या कार भारतीय बाजारात विकले जातील आणि परदेशात निर्यातही केले जातील.
शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काही काळात 1000 रुपये किमतीच्या आसपास राहील. काही दिवसापूर्वी टाटा मोटर्स स्टॉक 1,065.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे.
यावर्षी अवघ्या 4 महिन्यांत टाटा मोटर्स स्टॉक 25 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील एका वर्षात टाटा मोटर्स स्टॉकच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.