Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! संयम राखणाऱ्यांना टाटा मोटर्स शेअर्स मजबूत परतावा देणार, आली फायद्याची अपडेट

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या व्यवसाय ऑपरेशन्सचे दोन युनिट्समध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचा प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे केले जाणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध केले जातील. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के वाढीसह 1,020.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सोमवारी किंचित घसरणीसह 987.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरधारकांना नव्याने सूचीबद्ध झालेल्या दोन्ही कंपन्यांमध्ये समान शेअर्स वाटप केले जातील. टाटा मोटर्स कंपनीचा व्यवसाय डिमर्जर झाल्यानंतर एक युनिट प्रवासी वाहने आणि दुसरा युनिट इलेक्ट्रिक वाहने, जग्वार आणि लँड रोव्ह संबंधित व्यवसाय हाताळणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण NCLT मार्फत केले जाणार आहे. ही पूर्ण डिमर्जर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने कालावधी लागू शकतो.
टाटा मोटर्स कंपनीचा प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि JLR व्यवसाय 2021 पासून वेगवेगळ्या सीईओद्वारे चालवला जात आहे. टाटा मोटर्स कंपनीने म्हटले आहे की, डिमर्जरमुळे कंपनीचे कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, या डिमर्जरद्वारे टाटा मोटर्स कंपनी उपलब्ध असलेल्या संधींचा अधिक चांगला फायदा घेऊ शकते.
टाटा मोटर्स कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली होती. डिसेंबर तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा नफा 133 टक्क्यांनी वाढून 7100 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 25 टक्के वाढीसह 1.11 लाख कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 439.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 987.20 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 995.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 400.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 05 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS