
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सबाबत नवीन अपडेट आली आहे. मूडीजने टाटा मोटर्स कंपनीचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग Ba3 वरून Ba1 वर अपग्रेड केले आहे. रेटिंग्सबाबत सकारात्मक अपडेट आल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
मागील आठवड्यात बुधवारी टाटा मोटर्स स्टॉक 1.14 टक्के वाढून 1025.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.40 लाख कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 1,075.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1179.05 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 593.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात टाटा मोटर्स स्टॉक 30 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्के नफा कमावून दिला आहे.
जून 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा PAT वार्षिक आधारावर 74 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा PAT 3,203 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीने 5,566 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. एप्रिल-जून तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा कामकाजी महसूल 5.7 टक्क्यांनी वाढून 1.07 लाख कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.