
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने टाटा मोटर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या इंडिया बिझनेस ॲनालिस्ट मीटनंतर ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी हा स्टॉक निवडला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला विश्वास आहे की, कंपनी पुढील काळात शाश्वत पद्धतीने उद्योगामध्ये सर्वोच्च वाढ साध्य करु शकते. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.76 टक्के वाढीसह 989.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने टाटा मोटर्स स्टॉकमध्ये 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यात हा स्टॉक 1200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 951 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 568.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.16 लाख कोटी रुपये आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचा देशांतर्गत CV उद्योग आर्थिक वर्ष 2024-29 मध्ये 4-5 टक्क्यांनी वाढू शकतो. टाटा मोटर्स कंपनीचे लक्ष आपल्या पॅसेंजर व्हेइकल्स व्यवसायाच्या विस्तारावर देखील आहे. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या मार्केट मधीलवाटा 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. यामुळे टाटा मोटर्स कंपनीच्या सीएनजी आणि ईव्ही व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.