
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 4 टक्के वाढीसह 624.65 रुपये उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने जग्वार अँड लँड रोव्हरच्या विक्रीमध्ये अप्रतिम वाढ नोंदवल्यानंतर गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.68 टक्के वाढीसह 622.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत टाटा मोटर्स स्टॉक 2.94 टक्के वर होता. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.02 लाख कोटी रुपये आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 375.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 2023 या वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत यावर्षी 59.94 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 462 टक्के परतावा कमावून दिला आहे.
विक्री तपशील :
टाटा मोटर्स कंपनीच्या मालकीच्या जग्वार-लँड रोव्हर कंपनीने एप्रिल-जून 2023 तिमाहीमध्ये 30 टक्के वाढीसह 93,253 युनिट्सची वार्षिक विक्री वाढ साध्य केली आहे. कंपनीची किरकोळ विक्री वार्षिक 29 टक्के वाढीसह 101,994 युनिट्सवर पोहोचली आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत जग्वार-लँड रोव्हर कंपनीच्या विक्रीमधील वाढीत सुधारणा पाहायला मिळत आहे. चिप आणि इतर पुरवठ्यातील अडचणीमुळे कंपनीच्या कामकाजात अडचणी आल्या होत्या, मात्र त्यात आता सुधारणा पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या किरकोळ विक्रीमध्ये मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीच्या तुलनेत 29 टक्के वाढ साध्य झाली आहे. कंपनीने याकाळात 101,994 युनिट्सची विक्री केली आहे. दरम्यान टाटा मोटर्स कंपनीची देशांतर्गत विक्री जून 2023 मध्ये 1 टक्क्यांच्या वाढीसह 80,383 युनिट्स नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 79,606 युनिट्स विक्री नोंदवली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.