
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 45 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते.
मागील काही दिवसापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती. मात्र अवघ्या दोन दिवसात हा स्टॉक 610 रुपयेवरून 627 रुपये किमतीवर पोहचला आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 627 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा मोटर्स स्टॉक टार्गेट प्राईस जाहीर
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 3 महिन्यांसाठी टाटा मोटर्स स्टॉकवर 605-622 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि दीर्घ कालीन गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 696 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. नुकसान टाळण्यासाठी तज्ञांनी या स्टॉकवर 578 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पटली किंमत 665 रुपये होती.
टाटा मोटर्स ही कंपनी प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन विभागात व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. जागतिक बाजारपेठेत टाटा मोटर्स कंपनी जग्वार आणि लँड रोव्हर यासारख्या कंपनीची मालक म्हणून ओळखली जाते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या एकूण विक्रीत JLR कंपनीचे योगदान 65 टक्के होते.
एकूण विक्रीत इंजिन व्यावसायिक वाहनांचे योगदान 20 टक्के आणि प्रवासी वाहनांचे योगदान 14 टक्के होते. व्यावसायिक वाहनांमध्ये टाटा मोटर्स कंपनीने वाहन बाजाराचा 40 टक्के वाटा काबीज केला आहे. आर्थिक वर्ष 2025 कंपनीने निव्वळ कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीवर 43700 कोटी रुपये कर्ज होते.
मागील एका आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 2.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.3 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 12 टक्के आणि मागील सहा महिन्यांत लोकांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 42 टक्के आणि मागील तीन वर्षांत 340 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.