
Tata Motors Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाकडून १२९७ बसच्या चेसिसचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला 3500 युनिट्सचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. टाटा मोटर्स कंपनीला एलपीओ १६१८ चेसिससाठी हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 2.99 टक्के घसरून 756.45 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
टाटा मोटर्सला यूपीमधून तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला १३५० युनिट्सचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाकडून टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला 1000 युनिटचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. केवळ उत्तर प्रदेशातून टाटा मोटर्स कंपनीला तीन मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.
कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल कसे होते
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल ८ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केले होते. दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ११.१८ टक्क्यांची घट झाली आहे. तर टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या महसुलात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ६.११ टक्क्यांनी घट झाली आहे. तर नफा देखील ३९.९४ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,78,790 कोटी रुपये आहे.
टाटा मोटर्स शेअरने 2,297% टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स शेअर 4.04% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 1.44% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.84% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 4.10% परतावा दिला आहे. YTD आधारावर हा शेअर 3.78% घसरला आहे. तसेच मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 332.37% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,297.57% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.