 
						Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीबाबत सकारात्मक अपडेट समोर आली आहे. कारण टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर लिमिटेड (NSE: TATAPOWER) कंपनीने भूतान मधील खोरलोचू हायड्रो पॉवर लिमिटेड कंपनीचा ४० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने सोमवारी या अधिग्रहणाची माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी टाटा पॉवर कंपनी शेअर 1.27 टक्के घसरून 420.30 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा पॉवर कंपनी अंश)
कंपनीने काय म्हटले?
टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने खोरलोचू हायड्रो पॉवर लिमिटेडमधील ४०% हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या मुद्द्यावर टाटा पॉवर कंपनीने केएचपीएल आणि केएचपीएलच्या शेअरहोल्डर्सकडून हिस्सा खरेदी करण्यासाठी सोमवारी करार केला.
अक्षय ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित
टाटा पॉवर लिमिटेड कंपनी हा हिस्सा खरेदी करण्यासाठी एकूण ८३० कोटी रुपये खर्च करणार आहे. पहिला टप्पा ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या करारामुळे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीला ६०० मेगावॅटच्या या प्रकल्पात हिस्सा मिळणार आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने सध्या अक्षय ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 6.26% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 75.64% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात 606.39% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 4020% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 27.25% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		