 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3.93 टक्के वाढीसह 278.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.58 टक्के वाढीसह 274.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 88 हजार कोटी रुपयेवर पोहचले आहे. तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक पुढील काही दिवसात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आयडीबीआय कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स प्रमुख मूलभूत तत्वे मजबूत असलेल्या शेअर्सपैकी एक आहे.
टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत आपला महसूल आणि EBITDA दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जर एखादी कंपनी आपला महसूल आणि EBITDA 4 वर्षात दुप्पट करू शकते, तर तिचा कम्पाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट 20 टक्के असू शकतो. Tips2Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 306 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
टाटा पॉवर कंपनीने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 9 टक्क्यांच्या वाढीसह 1.017.41 कोटी रुपयेवर पोहचला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे निव्वळ नफा देखील वाढला आहे. मागील वर्षी 2022-23 च्या याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 935.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		