Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर पॉवर दाखवणार, 1 महिन्यात 26% परतावा दिला, आता या कारणाने अजून तेजीत

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 88,100 कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 278.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 182.35 रुपये होती.

मागील 5 दिवसात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 6 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने लोकांना 12.35 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 26 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 282.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जानेवारी 2023 पासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांकी किमतीवरून हा स्टॉक 800 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच बिकानेर-नीमराना ट्रान्समिशन प्रकल्पाचे अधिग्रहण केले आहे. हे टाटा पॉवर कंपनीच्या ऊर्जा प्रसारण व्यवसायाच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे.

टाटा पॉवर कंपनीने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कन्सल्टिंग कंपनीद्वारे SPV अंतर्गत बिकानेर 3-निमरणा 2 ट्रान्समिशन प्रकल्पाची बोली जिंकली आहे. टाटा पॉवर कंपनीने बिकानेर नीमराना ट्रान्समिशन प्रकल्पाचा उल्लेख अक्षय ऊर्जा उद्योगाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प असे केले आहे.

टाटा पॉवर कंपनीला हे कंत्राट टेरिफ आधारित स्पर्धात्मकतेच्या प्रक्रियेनुसार देण्यात आले आहे. यासाठी टाटा पॉवर कंपनीला इरादा पत्र देखील इश्यू करण्यात आले आहे. टाटा पॉवर कंपनीला मिळालेला नवीन प्रकल्प बांधा, स्वतः चालवा, हस्तांतरण करा या तत्त्वावर देण्यात आला आहे.

टाटा पॉवर कंपनी राजस्थानमधील बिकानेर वीज निर्मिती संकुलातून 7.7 GW नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे काम करेल. यासह टाटा पॉवर कंपनीला 340 किलोमीटर लांबीचा ट्रान्समिशन कॉरिडॉर उभारायचा आहे, जो नीमराना 2 सब स्टेशनला जोडला जाईल. पुढील 35 वर्षासाठी या वीज पारेषण प्रकल्पाच्या देखभालीचे काम टाटा पॉवर कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1544 कोटी रुपये असून पूर्ण करण्याची मुदत 24 महिने आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 05 December 2023.