
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत व्यवहार पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकने फारशी उत्साहवर्धक कामगिरी केलेली नाही. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
ज्या गुंतवणूकदारांनी टाटा पॉवर स्टॉक होल्ड केला आहे, त्यांच्या मनात हा स्टॉक पुढील काळात वाढेल की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला असणार. मात्र काळजी करू नका, तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 437.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांच्या मते, पुढील 6 ते 8 महिन्यात टाटा पॉवर स्टॉक 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 400 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला टाटा पॉवर स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी महाग वाटत आहे, तर तुम्ही पुढील 6 ते 8 महिन्यांसाठी NHPC स्टॉक देखील खरेदी करू शकता. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी NHPC स्टॉक 0.14 टक्के घसरणीसह 103.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हे दोन्ही शेअर्स पुढील 6-8 महिन्यात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 434 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 यावर्षात टाटा पॉवर स्टॉक 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 महिन्यांत टाटा पॉवर स्टॉकची किंमत फक्त 5 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकची किंमत 5 टक्क्यांनी घसरली होती. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने मे महिन्यात टाटा पॉवर स्टॉक 490 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.