 
						Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट तेजीत धावत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे.
या तेजीच्या काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 103896.47 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.91 टक्के वाढीसह 332.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 डिसेंबर 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 207.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 332 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात टाटा पॉवर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 20.94 टक्के नफा कमावून दिला आहे. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 342 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे.
6 डिसेंबर रोजी टाटा पॉवर स्टॉक 6 टक्के वाढीसह 298.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 335.80 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 7 एप्रिल 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 298 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दुसऱ्याच दिवशी या स्टॉकने 300 रुपये किंमत पार केली.
टाटा पॉवर कंपनीने पुढील तीन वर्षांत ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्यासाठी 60,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या एकूण गुंतवणुकीतील निम्मी रक्कम अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवली जाईल. टाटा पॉवर कंपनी आता यापुढे कोळसा आधारित कोणताही नवीन वीज निर्मिती प्लांटमध्ये गुंतवणूक करणार नाही. सध्या टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 86513.82 कोटी रुपये आहे.
टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. तर आर्थिक वर्ष 2024- 25 मध्ये कंपनीने 20,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये टाटा पॉवर कंपनी व्यवसाय वृद्धीसाठी 22,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये कंपनीने वीज क्षेत्रात 23,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच पुढील तीन आर्थिक वर्षांमध्ये टाटा पॉवर कंपनीचा एकूण भांडवली खर्च 60,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल.
टाटा पॉवर कंपनी 13,000 कोटी रुपयेच्या गुंतवणुकीसह प्रत्येकी 2,800 मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत पंप स्टोरेज प्रकल्प स्थापन करणार आहे. आणि कंपनीने प्रत्येकी 9,000 मेगावॅट क्षमतेचे आणखी तीन प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र राज्यात रायगड जिल्ह्यातील पोटलपाली, कातळधारा आणि नेनावली या ठिकाणी उभारले जाणार आहेत. यासह कंपनीने भिवपुरी आणि शिरवटा येथील दोन पीएसपीमधून निर्माण केल्या जाणाऱ्या विजेसाठी कोणताही खरेदी करार केला नाहीये. टाटा पॉवर कंपनीने वरील प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षमतेची अधिक भर घालण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		