 
						Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 262.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 256.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच टाटा पॉवर कंपनीने Chalet Hotels सोबत 6 MW ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा करार केला आहे. म्हणून हा स्टॉक सोमवारी तेजीत धावत होता. टाटा पॉवर कंपनी जो नवीन प्लांट उभारणार आहे, तो 13.75 दशलक्ष युनिट्स हरित स्वच्छ ऊर्जा निर्माण करणार आहे. ही वीज निर्मिती अक्षय ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती टाटा पॉवर कंपनीने दिली आहे. टाटा पॉवर कंपनी आपले हरित ऊर्जा लक्ष गाठण्याचा प्रयत्न करत आहे.
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी हरित ऊर्जा निर्मितीमध्ये आपले योगदान देऊन दर वर्षी 5500 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत करणार आहे. मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्क्यांनी वाढली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 182.45 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		