 
						Tata Power Share Price | दिग्गज टायर निर्माता कंपनी ब्रिजस्टोन इंडियाने टाटा पॉवर कंपनी सोबत एक व्यापारी करार केला आहे. टाटा पॉवर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या भागीदारी अंतर्गत टाटा पॉवर कंपनी ब्रिजस्टोन डीलरशिपमध्ये 25/30 kWh क्षमतेचे DC फास्ट चार्जर स्थापन करणार आहे. हे चार्जर अवघ्या एका तासात पूर्ण चारचाकी वाहन चार्ज करेल.
एका दिवसात या चार्जरच्या माध्यमातून 20-24 वाहने चार्ज करता येणार आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 255.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा पॉवर कंपनी तर्फे बसवण्यात येणार हे चार्जर इलेक्ट्रिक वाहनांना 24 तास सेवा प्रदान करतील. या चार्जिंग स्टेशनवर ब्रिजस्टोन कंपनीच्या ग्राहकांव्यतिरिक्त, इतर सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांचे चालक देखील सेवांचा लाभ घेऊ शकतात. ब्रिजस्टोन इंडिया कंपनीने म्हंटले आहे की, “टाटा पॉवर कंपनी सोबत हा जो संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आला आहे, तो वाहन चालकांना सर्व सुविधा प्रदान करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. टाटा पॉवर कंपनी या ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स बसवणार आहे, सोबतच त्यांचे देखभालचे काम देखील करणार आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 254.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञाच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 300 रुपये लक्ष किंमत जाहीर करून, स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		