12 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, 3 वर्षात दिला 300 टक्के परतावा, अजून एका बातमीने अपेक्षा वाढल्या

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी Tata Renewable Energy Limited कंपनीने तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्यात 4.3 गिगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा सेल आणि मॉड्यूल निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने या ग्रीन फील्ड पॉवर प्लांटसाठी टाटा रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला 42.5 दशलक्ष डॉलर्स मदत निधी देण्याची घोषणा केली आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनी ही टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. टाटा पॉवर कंपनीच्या तामिळनाडू पॉवर प्लांटमधून पहिल्या मॉड्यूलचे उत्पादन 2023 च्या शेवटी सुर होण्याची शक्यता आहे. या पॉवर प्लांटमधून पहिल्या सेलचे उत्पादन 2021-25 वर्षाच्या जून तिमाहीपासून सुरू होईल. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.04 टक्के वाढीसह 265.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 273 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीच्‍या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीने आपल्या जून तिमाही निकालात माहिती दिली आहे की, कंपनीच्या एकूण विक्री दोन टक्क्यांच्या वाढीसह 15003 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत, टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 43 टक्क्यांच्या वाढीसह 3005 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आणि कंपनीने जून तिमाहीत 69 टक्क्यांच्या वाढीसह 1141 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 30 जून 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17643 कोटी रुपये होता. टाटा पॉवर कंपनी नुकताच 4199 मेगा वॅट क्षमता साध्य केली आहे. टाटा पॉवरच्या रुफटॉप सोलर आणि ग्रुप कॅप्टिव्ह ऑर्डर बुकचा आकार 2504 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x