
Tata Power Share Price | टाटा उद्योग समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 235 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 265 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17643 कोटी रुपये आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीने स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI सोबत व्यापारी करार केला आहे.
टाटा पॉवर सोलर सिस्टीम कंपनीने सूक्ष्म आणि लघु उद्योगांना रुफटॉप सोलर खरेदी करण्यासाठी सुलभ वित्त सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून SIDBI सोबत करार केला आहे. आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 264.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सौर ऊर्जा संबंधित सेवा प्रदान करणारी कंपनी मानली जाते. टाटा पॉवर आणि सिडबीमधील नवीन करारानुसार, जर कोणत्याही लघु उद्योजकाला त्याच्या औद्योगिक युनिट किंवा घराच्या छतावर रुफटॉप सोलर प्लांट लावायचा असेल तर त्याला टाटा पॉवर किंवा त्याच्या देशभरातील अधिकृत भागीदाराकडून सेवा दिली जाईल आणि त्यासाठी ग्राहकांना सिडबीद्वारे वित्तपुरवठा देखील केला जाईल.
SIDBI आणि टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देणार आहे. SIDBI ने टाटा पॉवर कंपनीसोबत करार करून सूक्ष्म आणि लघु उद्योगांना वित्तपुरवठा करण्याची सेवा सुरू केली आहे.
टाटा पॉवर सोलर सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की, एमएसएमईंना उत्कृष्ट सुविधा आणि सुलभ व्याजासह कर्ज देऊन सौरऊर्जेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 267 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 31 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.