 
						Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील सलग ६ सत्रात या टाटा स्टील स्टॉकमध्ये ७% घसरण (NSE: TATASTEEL) झाली आहे. दरम्यान, याच कालावधीत BSE मेटल इंडेक्समध्ये ४.४७% घसरण झाली होती, तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये देखील ३.५५% घसरण झाली आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.17 टक्के वाढून 159.33 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
गुरुवारपर्यंत टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,98,738 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं आहे. मात्र, असं असलं तरी स्टॉक मार्केट तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो असे चार्टवर संकेत दिसत आहेत.
मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
जगप्रसिद्ध मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअरची BUY रेटिंग जाहीर केली आहे. तसेच या शेअर्ससाठी १७५ रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करताना ‘इक्वल वेट’ अशी कॉल रेटिंग अपग्रेड केली आहे. तर प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअरसाठी १८० रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे आणि त्यासाठी १२ महिन्याचा कालावधीत दिला आहे. त्यामुळे दोन मोठ्या ब्रोकरेजने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
ग्लोबल जेफरीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
ग्लोबल जेफरीज ब्रोकरेज फर्मने देखील टाटा स्टील लिमिटेड स्टॉकसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी २०० रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. दरम्यान, ग्लोबल जेफरीज ब्रोकरेज फर्मने आपल्या नोट मध्ये म्हटले आहे की, टाटा स्टील लिमिटेड युरोपचा EBITDA प्रति टन सध्याच्या ४० डॉलरच्या नुकसानीवरून कमी होऊन आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २० डॉलरपर्यंत येईल, असे संकेत ग्लोबल जेफरीज ब्रोकरेज फर्मने त्यांच्या नोट मध्ये दिले आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीज आणि एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज – BUY रेटिंग
देशांतर्गत प्रसिद्ध असलेल्या एचडीएफसी सिक्युरिटीजने देखील टाटा स्टील स्टॉकसाठी १८८ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच एचडीएफसी सिक्युरिटीजने १५० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. तर एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फर्मने १८३ रुपयांची टार्गेट प्राईस आणि १४९ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		