
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.50 टक्के वाढीसह 136.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. मागील वर्षी डिसेंबर 2022 या महिन्यात टाटा स्टील कंपनीचे शेअर 101.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या एका वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
गुंतवणूक सल्लागार टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 150 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सोमवारी (18 डिसेंबर 2023) हा शेअर 0.29% घसरून 136.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.
टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,67,734.47 कोटी रुपये आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने लंडनमध्ये शाश्वत डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी इम्पीरियल कॉलेज लंडनसोबत एक सामंजस्य करार संपन्न केला आहे.
टाटा स्टील कंपनीने म्हंटले आहे की, हे केंद्र कंपनीला तंत्रज्ञानाचा गतिशिल विकास आणि धोरणात्मक क्षेत्रात वाढ सक्षम करेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टाटा स्टील कंपनी पुढील चार वर्षांत या केंद्रात 10 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 55910.16 कोटी रुपये महसूल संकलित केले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 60666.48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत टाटा स्टील कंपनीच्या महसुलात 7.14 टक्के घट झाली आहे. टाटा स्टील कंपनीला जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 6,511.16 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 1,297.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.