27 July 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठा फायदा होणार

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 165.63 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यांनतर हा स्टॉक जबरदस्त तेजीत आला होता. ( टाटा स्टील कंपनी अंश )

दरम्यान ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.01 टक्के वाढीसह 167.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक पुढील काही दिवसात 180 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टाटा स्टील ही कंपनी मुख्यत्वे मेटल क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे. ही कंपनी 1960 पासून या व्यवसायात गुंतलेली आहे.

टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 204917.17 कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 517.56 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत एकूण 58863.22 कोटी रुपये कमाई केली आहे. हे प्रमाण डिसेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत 5.98 टक्क्यांनी अधिक आहे.

टाटा स्टील कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 33.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 19.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी टाटा स्टील कंपनीचे 23.45 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 28.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 19 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 01 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x