 
						Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 156.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पहिल्यांदाच 150 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,90,060.41 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के घसरणीसह 152.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 101.65 रुपये होती. तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉकमध्ये 147.40 रुपये किमतीवर ब्रेकआऊट पाहायला मिळत आहे. जर शेअरने ब्रेकआऊट तोडला तर अल्पावधीत स्टॉक 175 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
मात्र तज्ञांनी गुंतवणुकदारांना 135 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. काही तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स अल्पावधीसाठी 153 रुपये ते 160 रुपये दरम्यान ट्रेड करू शकतात. आणि पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 200 रुपये ते 225 रुपये प्रति शेअर किंमत स्पर्श करू शकतात.
मागील 6 महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 104 टक्क्यानी वाढवले आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 194 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		