
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत व्यवहार करत होते. बुधवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 146 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 143.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 7 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 147.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 144.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2023 मध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 101.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच NCLT ने TRF लिमिटेड आणि टाटा स्टील कंपनीचे विलीनीकरण रद्द करण्यास परवानगी दिली आहे.
7 फेब्रुवारी 2024 रोजी, टाटा स्टील कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने TRF लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण करण्याचा निर्णय मागे घेतला होता. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठने 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा विलीनीकरण प्रस्ताव रद्द करण्यास मंजुरी दिली आहे.
टाटा स्टील कंपनीने यापूर्वी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, टीआरएफ, द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड, एस अँड टी मायनिंग कंपनी यासह नऊ कंपन्यांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती. सध्या ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 150 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टाटा स्टील स्टॉक आकर्षक वाटत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.