
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्क्यांच्या वाढीसह 132.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत 13.64 टक्के वाढली आहे.
1 सप्टेंबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 128.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी टाटा स्टील शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 130.05 रुपये (NSE सकाळी 10:00 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 1 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. सोमवारी हा स्टॉक 4.37 टक्क्यांच्या वाढीसह 132.65 रुपये किमतीवर पोहचला होता. 2023 या वर्षात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 11.03 टक्के वाढले आहेत. आणि मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 25.44 टक्के नफा कमावून दिला आहे. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,61,302.78 कोटी रुपये आहे .
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात YOY आधारावर 92 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. जून 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 633.95 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7,764.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 1704.86 कोटी रुपयेवरून 63 टक्के घट नोंदवली गेली आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 166 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मने टाटा स्टील स्टॉकवर 147-166 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना 116 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये टाटा स्टील स्टॉक 147 रुपये ते 166 रुपये किमतीच्या दरम्यान पोहोचू शकतो. जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही 116 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून टाटा स्टील स्टॉक खरेदी करू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.