
Tata Technologies IPO | सध्या शेअर बाजारात टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या IPO बद्दल चर्चा होत आहे. हा IPO आहे, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा. तब्बल वीस वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने देखील हिरवा कंदील दिला आहे. या IPO च्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विकणार आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 400 रुपये ते 542 रुपये दरम्यान असू शकते. या कंपनीच्या आयपीओचा आकार जवळपास 22,015 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओद्वारे टाटा मोटर्स कंपनी आपले 9.9 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे.
केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स ही टाटा समूहाचा भाग असलेली एक सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आगामी IPO च्या माध्यमातून आपले शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
टाटा मोटर्स कंपनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपले आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. तज्ञांच्या मते पुढील 2-3 आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात खुला केला जाईल. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 255 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.