 
						Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांची बोलणी सुरू आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजीत वाढत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 275 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा समूह तब्बल दोन दशकांनंतर आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी टाटा समूहाचा एक भाग आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः ऑटो आणि एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांना अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. तब्बल 2 दशकांनंतर टाटा समूह आपल्या कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करेल.
या IPO मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे मूल्यांकन 2.5 बिलियन डॉलर्स करण्यात आले आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या 350-375 दशलक्ष डॉलर्सचा IPO लाँच करण्यापूर्वी ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅनली, घिसल्लो कॅपिटल, ओक्ट्री कॅपिटल, की स्क्वेअर कॅपिटल यांच्यासोबत गुंतवणुकी संबंधित चर्चा सुरू केली आहे.
परकीय गुंतवणूक संस्था आणि फंडींग संस्था अँकर बुकमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अँकर बुकमध्ये उच्च प्रोफाइल संस्थात्मक गुंतवणूकदारांना IPO लाँच करण्यापूर्वी गुंतवणुकीची संधी दिली जाते. तज्ञांच्या मते अनेक मोठे गुंतवणूकदार टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत उत्साही आहेत.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे मूल्यांकन 2.5 अब्ज डॉलर्स आहे. मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या मुल्याकनात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील महिन्यात TPG ने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये प्री फंड राऊंडमध्ये 9.9 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		