 
						Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर मंगळवारी सलग सहाव्या सत्रात एक हजार रुपयांच्या खाली बंद (NSE: TATATECH) झाला होता. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.37% टक्के वाढून 944.70 रुपयांवर पोहोचला होता. १८ नोव्हेंबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ९३९.६५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरचा मूव्हिंग ऍव्हरेज
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा शेअर 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी पेक्षा खाली ट्रेड करत आहे. मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या एकूण ०.६४ लाख शेअर्सचे ट्रेड पार पडले. बीएसईवर टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे मार्केट कॅप ३८,४७३ कोटी रुपयांवर पोहोचले.
स्टॉक टेक्निकल चार्ट
स्टॉक टेक्निकल चार्टवर टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) २९ आहे, ज्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
डेली चार्टवर शेअर ओव्हरसोल्ड
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन म्हणाले, ‘टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मागील काही दिवस घसरतो आहे, पण डेली चार्टवर शेअर ओव्हरसोल्ड दिसतो आहे. नजीकच्या काळात ११२० रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करावा. पण शेअर ९९७ रुपयांच्या वर जात असेल तरच गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करावी असा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज शेअरला 881 ते 800 रुपयांच्या आसपास सपोर्ट आहे. तसेच १०४० रुपयांवर रेझिस्टन्स आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		