23 March 2023 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

Tata Group Stock | टाटा तिथे नो घाटा! टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर शेअरची किंमत निम्म्याहून स्वस्त झाली आहे, स्टॉक खरेदी करणार?

Tata group stock

Tata Group Stock | टाटा समूहातील हा स्टॉक मागील काही काळापासून सातत्याने गडगडत आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. एकेकाळी बंपर परतावा देणारा हा स्टॉक सध्या त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत सुमारे 65 टक्के कमजोर झाला आहे. टाटा समूहातील हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आपण ह्या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड”. या कंपनीला आपण TTML या नावानेही ओळखतो. सध्या TTML कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये पर्यंत खाली पडली आहे.

वर्ष दर वर्ष आधारावर परतावा :
TTML कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी वर्ष दर वर्ष या आधारे आतापर्यंत 54 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. यादरम्यान हा स्टॉक 291 रुपये या उच्चांक ट्रेडिंग किमतीवरून 100 रुपयांवर आला आहे. म्हणजेच ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 216 रुपये किंमत असताना एक लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 46 हजारांवर आले आहे. त्याच वेळी जर तुम्ही शेअरची किंमत 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर असताना 1 लाख रुपये लावले असते तर, तुमचे गुंतवणूक मूल्य आगा 34 हजारांवर आले असते. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर सुमारे 2 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी, मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये जवळपास 53 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. TTML ही टाटा उद्योग समूहातील एक लार्ज कॅप कंपनी आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
TTML ही कंपनी टाटा उद्योग समूहातील Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या बिझनेस सेगमेंटमध्ये मार्केट लीडर मानली जाते. TTML कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवण्याचे काम करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या कंपन्याचे नावे सामील आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मागील काही महिन्यात या कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली आहे. या कंपन्यांना TTML क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण सेवा प्रदान करते. या कंपनीचा सेवा उच्च दर्ज्याच्या असल्याने त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Teleservices Maharashtra Limited also known as TTML of Tata group stock price and return on investment on 14 November 2022.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x