
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. तज्ञांच्या मते, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यास भविष्यात आयटी स्टॉकसाठी एक मोठे ट्रिगर ठरू शकते. ( टीसीएस कंपनी अंश )
ट्रेडेनोमी रिसर्चनुसार टीसीएस स्टॉक अपट्रेंड कन्सोलिडेशन झोनमध्ये ट्रेड करत आहे. सध्या हा स्टॉक आपल्या ब्रेकआउट पातळीच्या जवळ पोहोचला आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 3,821.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ट्रेडऑनॉमी फर्मच्या तज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा टीसीएस स्टॉकने ब्रेकआउट दिला आहे, तेव्हा तो 80 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. तज्ञांच्या मते, टीसीएस स्टॉक पुढील काळात 6300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील तीन वर्षांपासून टीसीएस कंपनीचा शेअर 3000 रुपये ते 4000 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. सोमवारी टीसीएस कंपनीचे शेअर्स 3847.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, जर या स्टॉकने 4200 रुपये किंमत पातळी ओलांडली तर हा स्टॉक मजबूत तेजीत वाढू शकतो.
मागील काही वर्षांपासून टीसीएस स्टॉकमध्ये सातत्याने कमजोरी पाहायला मिळत आहे, कारण अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेतील मागणी घटली आहे. मागील 3 महिन्यांत टीसीएस स्टॉक 6 टक्के खाली आला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4254 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3156 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.