
Technocraft Industries Share Price Today | ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. मात्र आज शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची इंट्रा डे उच्चांक पातळी किंमत 1562 रुपये होती. कापूस पासून बनवल्या जाणाऱ्या धाग्याचा व्यवसाय करणाऱ्याया कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. (Technocraft Industries Limited)
स्टॉक मधील तेजीमुळे ही कंपनी गुंतवणूकदारांच्या नजरेत पडली आणि शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘सुनील सिंघानिया’ यांनी देखील ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’ कंपनीमध्ये गुंतवणूक केली. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 1,490.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
दिग्गज गुंतवणूकदार ‘सुनील सिंघानिया’ यांनी मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या मार्च तिमाहीत ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’ कंपनीचे 111.50 कोटी रुपये मूल्याचे 735324 शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर कंपनीतील त्यांची एकूण गुंतवणूक 3 टक्क्यांवरून वाढून 3.2 टक्केवर पोहचली.
सुनील सिंघानिया यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘टेक्नोक्राफ्ट’ कंपनीमध्ये 0.2 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. 17 एप्रिल 2023 रोजी टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1583 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 67 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 31.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.