
Tejas Networks Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी पातळीवर पोहचला आहे. टाटा समूहाच्यामध्ये देखील जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 864 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 459.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14 हजार कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के वाढीसह 859.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tejas Share Price)
तेजस नेटवर्क्स कंपनीच्या प्रवर्तक गटात टाटा समूह देखील सामील आहे. तेजस नेटवर्क्स कंपनीत टाटा सन्सने 55.97 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. 21 जुलै 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील तीन वर्षांत तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1340 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 348.50 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एक वर्षात तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 84.19 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीला BSNL कडून 15,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. तेजस नेटवर्क कंपनी TCS च्या नेतृत्वाखालील एका कंसोर्टियमचा भाग म्हणून काम करते. कराराचा एक भाग म्हणून , तेजस नेटवर्क कंपनी बीएसएनएल कंपनीला रेडिओ एक्सेस नेटवर्क उपकरणे पुरवणार आहे.
तेजस नेटवर्क कंपनी अत्याधुनिक राउटर वापरून पॅन इंडिया IP-MPLS आधारित ऍक्सेस अँड एग्रीगेशन नेटवर्कच्या अपग्रेडेशनसाठी BSNL कंपनीकडून 696 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. ही ऑर्डर तेजस नेटवर्क कंपनीला मिळालेली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.