 
						Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. सुरुवातीच्या काही तासात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 809.60 रुपये किमतीवर पोहचले होते.
टायगर लॉजिस्टिक्स इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 855 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 870 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 335 रुपये होती. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी टायगर लॉजिस्टिक इंडिया स्टॉक 1.75 टक्के वाढीसह 823.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 363 रुपये किंमत पातळीवरून 123 टक्के मजबूत झाले आहे. मागील एका वर्षात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कोरोना काळात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून शेअर तब्बल 2900 टक्के वाढला आहे. 4 मार्च 2024 च्या रेकॉर्ड तारखेला अनुसरून टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये टायगर लॉजिस्टिक्स कंपनीला भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली होती. टायगर लॉजिस्टिक ही कंपनी एक थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदाता म्हणून आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीचे काम करते. या कंपनीला भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीकडून मिळालेल्या ऑर्डरचे मूल्य 10 कोटी रुपये आहे. 1 महिन्यापेक्षा कमी काळात या कंपनीला मिळालेला हा दुसरा कॉन्ट्रॅक्ट आहे.
यापूर्वी टायगर लॉजिस्टिक्स कंपनीला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता. टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या ग्राहकांमध्ये, बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स, नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग आणि R&D इन्फ्रा, इंडियन ऑइल, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, IRCON इंटरनॅशनल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी यासारख्या दिग्गज कंपन्या आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		