
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 16 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. ( टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 63.66 टक्के वाढीसह 78.95 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक 3.70 टक्के वाढीसह 1,257.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टीटागढ़ रेल सिस्टीम्स कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत 48.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टँलीने टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग दिले आहे.
ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या शेअर्सवर 1285 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2020 रोजी टिटागड रेल सिस्टिम कंपनीचे शेअर्स 31.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1216.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 3 वर्षात टिटागड रेल सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 49 रुपयेवरून वाढून 1200 रुपयेवर पोहचली आहे. टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1249 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 321 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे.
16 मे 2023 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 327.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 मे 2024 रोजी टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1216.30 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 20 मार्च 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम कंपनीचे शेअर्स 823.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.