 
						Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 1.91 टक्के वाढीसह 1649.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,019 कोटी रुपये आहे. नुकताच क्रिसिल रेटिंग्सने टिटागड रेल सिस्टिम्स या वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बुधवारी हा स्टॉक 2 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 1,820.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टिटागड रेल सिस्टिम्स कंपनी अंश )
मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 57.16 टक्के वाढला आहे. 10 जुलै 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 481.85 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 24 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1689.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते.
या स्टॉकचा बिटा 1.3 आहे, जो या कालावधीत खूप उच्च अस्थिरता दर्शवतो. टेक्निकल चार्टवर टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजे RSI 71.7 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.
क्रेडिट रेटिंग एजन्सी क्राईसिलने टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉकची दीर्घकालीन रेटिंग ‘CRISIL A+/Stable’ वरून अपग्रेड करून AA-/Stable केली आहे. त्याचप्रमाणे, CRISIL ने टिटागड रेल सिस्टिम्सची अल्पकालीन रेटिंग CRISIL A1 वरून CRISIL A1+ अशी अपग्रेड केली आहे. टिटागड रेल सिस्टिम्स ही कंपनी मुख्यतः मालवाहू वॅगन, प्रवासी कोच, मेट्रो ट्रेन, ट्रेन इलेक्ट्रिकल्स, स्टील कास्टिंग, विशेष उपकरणे आणि पूल आणि जहाजे निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः मालवाहतूक रोलिंग स्टॉक, पॅसेंजर रोलिंग स्टॉक आणि जहाज बांधणी, पूल आणि संरक्षण या विभागात व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		