
Titagarh Share Price | टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 8.04 टक्के वाढीसह 687.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 696.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 361.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,605.03 कोटी रुपये आहे. सध्या या कंपनीच्या शेअर मध्ये जी वाढ होत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 32,000 कोटी रुपये मूल्याच्या रेल्वे विस्तार प्रकल्पांना मंजुरी दिल्याने सर्व रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तेजी आले आहे. रेल्वे कोच बनवणाऱ्या टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीला देखील या पॅकेजचा फायदा होऊ शकतो.
टेक्निकल चार्टवर टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरची स्थिती मजबूत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 720 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांच्या मते टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 715-720 रुपये पर्यंत वाढतील. यासह Tips2Trades फर्मच्या तज्ञांच्या मते टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 699 रुपये किमतीवर सहज पोहोचतील. त्यापुढील दुसरी लक्ष किंमत 765 रुपये राहील.
टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरने 610 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार केला आहे. जून 2023 च्या तिमाहीत टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 44.97 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 55.03 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.