
Titagarh Wagons Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 427 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते.
स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, निधी संकलनासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने बैठक आयोजित केली होती. यासोबत Titagarh Wagons कंपनीला BHEL कंपनीच्या सहकार्याने 80 वंदे भारत ट्रेन बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 413.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टिटागड वॅगन्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने निधी संकलनाचा प्रस्ताव पारित केला आहे. वंदे भारत ट्रेन व्यतिरिक्त टिटागड वॅगन्स कंपनीला 24,177 रेल्वे कोच बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. त्याचे मूल्य 7800 कोटी रुपये आहे.
मागील एका महिन्यात टिटागड वॅगन्स कंपनीच्या शेअर्सने लोकांना 19.71 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत टिटागड वॅगन्स कंपनीच्या शेअरने लोकांना 101.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी टिटागड वॅगन्स कंपनीचे शेअर्स घेतले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 282.43 टक्के वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 93.40 रुपये प्रति शेअर होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.