2 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्स या कारणाने तेजीत आले, फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा

Titan Share Price

Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आता या कंपनीने एक नवीन टप्पा पार केला आहे. टायटन कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 ट्रिलियन रुपये मार्केट कॅपिटलायझेशन टप्पा स्पर्श केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 3,400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे बाजार भांडाल 12.95 लाख कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी टायटन स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 3,420.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टायटन कंपनीने पुढील पाच वर्षात अभियांत्रिकी, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा विश्लेषण, विपणन आणि विक्री विभागात 3,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. टायटन कंपनी डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक कौशल्यासाठी कुशल कामगारांच्या शोधत आहे.

टायटन कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 940 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टायटन कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीने पुढील पाच वर्षासाठी 1,00,000 कोटी रुपये मूल्याचा व्यवसाय करण्यासाठी विशेष योजना आखली आहे. पुढील पाच वर्षांत कंपनी आपल्या कर्मचारी वर्गात आणखी 3000 लोकांचा समावेश करणार आहे.

सध्या टायटन कंपनीचे 60 टक्के कर्मचारी महानगरांमध्ये आणि 40 टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये काम करत आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत टायटन कंपनीने 33.6 टक्के वाढीसह 11660 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 8,730 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price NSE 22 November 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x