
Toll Tax New Rules | महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. अनेकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स भरावा लागतो, मात्र केंद्र सरकार लवकरच टोल टॅक्सशी संबंधित नियम बदलणार आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, टोल टॅक्सशी संबंधित विधेयक आणण्याचा सरकारचा विचार आहे.
तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार
टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यासोबतच येत्या काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर दिला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री म्हणाले.
बिल आणण्याची तयारी
नितीन गडकरी पुढे म्हणाले आहेत की, टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद अद्याप झालेली नाही, मात्र टोलसंदर्भात बिल आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कारवाई होणार नाही.
खात्यातून थेट पैसे कापणार
आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. “2019 मध्ये आम्ही एक नियम बनवला होता की कार कंपनी-फिटेड नंबर प्लेटसह येतील. त्यामुळे गेल्या चार वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबर प्लेट आहेत. 2024 पूर्वी देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस वे तयार होतील आणि रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरीचा असेल. यासोबतच येत्या काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर दिला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री म्हणाले.
सध्या काय आहे नियम
नितीन गडकरी म्हणाले की, सध्या जर एखाद्या व्यक्तीने टोल रस्त्यावर 10 किमी अंतर कापले तर त्याला 75 किमीचे शुल्क द्यावे लागते, परंतु नव्या प्रणालीत जेवढे अंतर कापले तेवढेच अंतर आकारले जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आर्थिक संकटातून जात असल्याचा त्यांनी इन्कार केला. “एनएचएआयची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यात पैशाची कमतरता नाही. ते म्हणाले की, पूर्वी दोन बँकांनी कमी दरात कर्ज देऊ केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.