
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 3,830 रुपये स्टॉपलॉस लावून 4,100 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 4035 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रेंट स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 4,047.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांच्या मते, ट्रेंट कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 4100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 3830 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4099 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1272.40 रुपये होती.
मागील 6 महिन्यांत ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 195 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट या रिटेल कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे.
मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ट्रेंड कंपनीने 138 टक्क्यांच्या वाढीसह 370.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 50 टक्के वाढीसह 3466 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कंपनीची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई 95 टक्के वाढीसह 629 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. तर कंपनीचे मार्जिन 18 टक्के नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 14 टक्के होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.