 
						Trishakti Share Price | मागील एका वर्षात त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा गुंतवणुकदारांच्या रडारवर आले आहेत. त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनी आपले शेअर्स 5 तुकड्यात विभाजित करण्याचा विचार करत आहे. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी त्रिशक्ती इंडस्ट्रीज स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 121.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
27 नोव्हेंबर 2023 रोजी त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 5 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये होईल. कंपनीने अद्याप शेअर विभाजनाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली नाहीये. त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनी प्रथमच आपले शेअर्स विभाजित करत आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना नियमित अंतराने लाभांश वाटप करते.
मागील आठवड्यात शुक्रवारी त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 118.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 123 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांचे पैसे 69 टक्क्यांनी वाढवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		