12 May 2025 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

TTML Share Price | टीटीएमएल शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, एका महिन्यात 25.65 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 78.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 1.85 रुपये होती. तर अवघ्या दोन वर्षांत हा शेअर 291 रुपये किमतीवर पोहोचला होता.

11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के घसरणीसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोरोना नंतरच्या दोन वर्षांत रतन टाटा यांनी स्थापन केलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. मागील एका महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.

काही दिवसांपूर्वी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 61.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 81.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. 14 जून 2023 रोजी हा स्टॉक 75.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जर आपण टीटीएमएल कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, टीटीएमएल कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 971 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 जुलै 2001 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 7.34 रुपयेवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 3.77 टक्के खाली आली आहे.

मागील 6 महिन्यांत टीटीएमएल स्टॉकने लोकांचे 20.39 टक्के नुकसान केले आहे. यावर्षी आतापर्यंत हा स्टॉक 14 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर मागील एका वर्षात स्टॉक 38 टक्क्यांनी खाली घसरला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 149 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 49.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 16 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या