 
						Tuni Textile Share Price | तुनी टेक्सटाईल मिल्स या टेक्सटाईल कंपनीचा पेनी स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी तुनी टेक्सटाईल मिल्स कंपनीचे शेअर्स 1.34 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( तुनी टेक्सटाईल मिल्स कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी तुनी टेक्सटाईल मिल्स स्टॉक 9.84 टक्के घसरणीसह 2.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तुनी टेक्सटाईल मिल्स कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 21.73 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 78.27 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या प्रवर्तक गटात एकूण 10 व्यक्ती आहेत. यामध्ये नरेंद्र कुमार सुरेका, प्रदीप कुमार सुरेका, उर्मिला सुरेका, प्रभुदयाल सुरेका सामील आहेत.
नरेंद्र कुमार सुरेका यांनी कंपनीचे 2.41 टक्के म्हणजेच 31,48,500 शेअर्स होल्ड केले आहेत. तर प्रभुदयाल सुरेका यांनी कंपनीचे 6.64 टक्के म्हणजेच 87,13,000 शेअर्स होल्ड केले आहेत. तुनी टेक्सटाईल मिल्स ही कंपनी मुख्यतः सिंथेटिक शर्टिंग बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना मुंबईमध्ये 1987 साली झाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		