27 July 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Unemployment Allowance | राहुल गांधी आश्वासनं पाळतात, काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये बेरोजगारांना दरमहा रु. 2500 बेरोजगारी भत्ता जाहीर

Unemployment Allowance

Unemployment Allowance | तरुण बेरोजगार असणाऱ्यांना छत्तीसगड सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्तीसगड सरकारने तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षापासून हा भत्ता दिला जाईल, असे ट्विट त्यांनी केले. बेरोजगारी भत्त्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.

तब्बल १५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे
छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या आश्वासनाच्या जोरावर काँग्रेस पक्ष १५ वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आला. पुढील आर्थिक वर्षापासून बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा पक्षाने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर दरमहा २५०० रुपये बेरोजगारी भत्ता जाहीर करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सध्या या योजनेचे निकष, रक्कम आणि अर्थसंकल्पीय तरतूद यावर काम करत आहे.

सरकारी अधिकारी सध्या बेरोजगारी भत्त्यासाठी राजस्थान मॉडेलचा अभ्यास करत आहेत. राजस्थान सरकार 2019 पासून तरुणांना ‘मुख्यमंत्री युवा संबल योजने’ अंतर्गत बेरोजगारी भत्ता देत आहे. छत्तीसगडवर सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) २६.२ टक्के कर्ज आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मजूर आणि महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना जाहीर केल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Unemployment Allowance declared by Chhattisgarh CM Bhupesh Baghel check details on 27 January 2023.

हॅशटॅग्स

#Unemployment Allowance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x