2 May 2025 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Unemployment Hike | पीएम मोदींचा प्रचारात धार्मिक मुद्द्यांवर भर, इकडे बेरोजगारीचा दर 2 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला - CMIE

Unemployment Hike

Unemployment Hike | ऑक्टोबर महिन्यात भारतात बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी लिमिटेडने हा दावा केला आहे. यानुसार ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमुळे ऑक्टोबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर दोन वर्षांहून अधिक काळातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

किती बेरोजगारी :
बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील ७.०९ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये १०.०५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मे २०२१ नंतरचा उच्चांक आहे. या काळात ग्रामीण बेरोजगारी ६.२ टक्क्यांवरून १०.८२ टक्क्यांवर गेली, तर शहरी बेरोजगारी किंचित कमी म्हणजे ८.४४ टक्के झाली.

वाढत्या ग्रामीण बेरोजगारीची कारणे :
तांदूळ, गहू आणि साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतात गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. तथापि, शहरी भागात उत्पादन आणि वापराच्या विस्तारासह आर्थिक क्रियाकलाप तुलनेने मजबूत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सरकारी सर्वेक्षणानुसार जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील बेरोजगारीचा दर ३.२ टक्के होता. हा सहा वर्षांतील नीचांकी स्तर आहे.

अर्थव्यवस्थेचा वेग :
भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ६ टक्क्यांहून अधिक दराने वाढेल आणि पुढेही वेगाने वाढेल, असा डंका मोदी सरकार पिटतय, मात्र लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याइतपत ते अजूनही वेगवान झालेले नाही. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये सुमारे एक कोटी लोकांनी काही तरी काम मिळेल या आशेने जॉब मार्केटमध्ये प्रवेश केला. मात्र या सरकारी वेबसाईट्स लोकांचा डेटा गोळा करण्यासाठीच आहे अशी टीका होऊ लागली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Unemployment Hike in October rises to more than two-years high says CMIE 02 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Unemployment Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या