
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म नोमुराने दिला आहे. ब्रोकरेज फर्मने मार्च 2023 तिमाहीचे कमजोर निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे.
शेअरची आजची किंमत
दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील VA टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.34 टक्के वाढीसह 453.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची टार्गेट प्राईस :
ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यावर तज्ञांनी 480 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 19 मे 2023 रोजी ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे शेअर्स 420 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे, सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 14 टक्के अधिक परतावा देऊ शकतो.
एका वर्षात 74 टक्के परतावा
या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे बाजार भांडवल 2,442.53 कोटी आहे.
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत ‘VA टेक वाबाग’ कंपनीला 111.1 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ‘VA टेक वाबाग’ कंपनीने 46 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने 3.7 टक्के वाढीसह 934.51 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 901.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
झुनझुनवाला पोर्टफोलिओ
मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांनी ‘VA टेक वाबाग’ कंपनीचे 8 टक्के म्हणजेच 5,000,000 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. याचे एकूण मूल्य 209.9 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मार्च 2023 तिमाहीमध्ये 35,882.8 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे 29 शेअर्स आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.