
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध झाले आहेत.
या कंपनीचा आयपीओ नुकताच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. 2 जून 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 15.60 टक्के वाढीसह 379 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी
लिस्टिंग झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात वासा डेंटिसिटी कंपनीच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहेत. मागील एका महिन्यात वासा डेंटिसिटी कंपनीच्या शेअरची किंमत 61.39 टक्के वाढली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 13.05 टक्क्यांच्या वाढीसह 327.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
NSE च्या अधिकृत वेबसाइटनुसार, दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी वासा डेंटिसिटी कंपनीचे 4,39,000 शेअर्स होल्ड केले आहेत. त्यांनी हे शेअर्स 302.59 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते. यासाठी त्यांनी तब्बल 13.28 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. कचोलिया यांनी वासा डेंटिसिटी कंपनीच्या शेअरमध्ये 30 जून 2023 रोजी गुंतवणूक केली होती.
गुंतवणुकीवर परतावा
वासा डेंटिसिटी कंपनीच्या आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंगनंतर 65 टक्के नफा मिळाला आहे. वासा डेंटिसिटी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 रुपये ते 128 रुपये निश्चित केली होती. 2 जून 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 211 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
मागील एका महिन्यात वासा डेंटिसिटी या SME स्टॉकने NSE इंडेक्सवर 328 रुपयेची किंमत पातळी स्पर्श केली होती. याचा अर्थ मजबूत स्टॉक लिस्टिंगसह वासा डेंटिसिटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.