 
						Vascon Engineers Share Price | व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 80.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
मागील पाच दिवसांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स स्टॉक 11.63 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी व्हॅस्कॉन इंजिनिअर्स स्टॉक 0.92 टक्के घसरणीसह 80.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला या आठवड्यात झारखंड स्टेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून 352.91 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड कंपनी सेबीला कळवले होते की, कंपनीला ब्रिज अँड रूफ कंपनी इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमकडून 262.19 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑर्डर अंतर्गत कांकेर, छत्तीसगड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन, डिझाइन, बांधकाम, आयटी नेटवर्किंग, देखभाल संबंधित काम करायचे आहे. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ईपीसी तत्त्वावर देण्यात आला आहे. या कॉन्ट्रॅक्टचे पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मागील सहा महिन्यांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 185.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 28 रुपयेवरून वाढून 80.60 रुपयेवर पोहचली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 126.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 35 रुपयेवरून वाढून 80.60 रुपये किमतीवर पोहोचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		