29 May 2023 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
x

Vedant Fashions Share Price | IPO लाँच नंतर 'वेदांत फॅशन' कंपनीचे शेअर्स प्रथमच स्वस्त झाले, सध्याचा स्थितीत पुढे फायदा होईल का?

Vedant Fashions Share Price

Vedant Fashions Share Price | भारतातील प्रसिद्ध विवाह पोशाख ब्रँड ‘मान्यवर’ या ब्रँडची पालक कंपनी ‘वेदांत फॅशन’ चे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांनी खाली आले होते. सुरुवातीच्या काही तासात स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 1,195 रुपयेवर आली होती. आजही या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘वेदांत फॅशन’ कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 1,231.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक घसरणीचे कारण :
‘वेदांत फॅशन’ कंपनीच्या प्रवर्तक ग्रुपने 9.88 टक्के भाग भांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे प्रवर्तक रवी मोदी अँड फॅमिली ट्रस्टने माहिती दिली की, ते भाग भांडवल विक्री ऑफरद्वारे कंपनीचे 7 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. स्टॉक ओव्हर सबस्क्रिप्शन झाल्यास अतिरिक्त 2.88 टक्के स्टेक विकण्याचा विचार देखील केला जात आहे.

रवी मोदी फॅमिली ट्रस्ट त्याच्या ट्रस्टी, मोदी फिड्युशरी सर्व्हिसेस मार्फत चालवले जाते. हे वेदांत फॅशन कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. कंपनीचे प्रवर्तक आपले शेअर विकून किमान सार्वजनिक शेअर होल्डिंगचे प्रमाण साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
वेदांत फॅशन कंपनीचा आयपीओ मागील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 824 ते 866 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 8 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. वेदांत फॅशन कंपनीच्या IPO अंतर्गत कोणतेही फ्रेश शेअर्स जारी करण्यात आले नव्हते. हा IPO पूर्णपणे OFS अंतर्गत खुला करण्यात आला होता. मागील एका वर्षाच्या कालावधीत, या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

‘वेदांत फॅशन’ ही मुख्यतः कंपनी पुरुषांच्या सेलिब्रेशन वेअर आयटम्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी इंडो-वेस्टर्न, शेरवानी, कुर्ते, जॅकेट्स आणि अॅक्सेसरीज, मान्यवर ब्रँड अंतर्गत बनवते. याशिवाय महिलांचे सेलिब्रेशन वेअर आयटम जसे की लेहेंगा, साड्या, शिलाई केलेले सूट, गाऊन आणि कुर्ती देखील कंपनी बनवते. ‘वेदांत फॅशन’ कंपनीचे भारतात 200 हून अधिक शहरांमध्ये 600+ स्टोअर्स चालु आहेत. आणि 11 आंतरराष्ट्रीय स्टोअर्ससह ‘वेदांत फॅशन’ कंपनी 3 देशांमध्ये व्यवसाय करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedant Fashions Share Price today on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Vedant Fashions Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x